देशात पूर्ण लॉकडाऊन लागणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Apr 18, 2021 | 3:47 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात सध्या पूर्ण लॉकडाऊनची स्थिती नाही, असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात सध्या पूर्ण लॉकडाऊनची स्थिती नाही, असं म्हटलं आहे. लॉकडाऊनचा निर्णय घाईगडबडीनं घेणार नाही, असं अमित शाह म्हणाले. अमित शाह यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे सांगितल्याची माहिती आहे. देशात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.