‘त्यांना’ या प्रकरणात दोषी बनवून अडकवले तर जात नाही ना? प्रदीप कुरुळकर संदर्भात कोणी उपस्थित केली शंका?
त्यांच्याकडून डीआरडीओ आणि भारतीय वायुदलातील अत्यंत माहिती घेण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. त्यावरून कुरुलकर यांना न्यायालयीन कोठडी देखिल मिळाली आहे. त्यावरून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून महिलांच्या साहाय्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून प्रदीप कुरुलकर आणि निखिल शेंडेंना जाळ्यात ओढण्यात आले. त्यांच्याकडून डीआरडीओ आणि भारतीय वायुदलातील अत्यंत माहिती घेण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. त्यावरून कुरुलकर यांना न्यायालयीन कोठडी देखिल मिळाली आहे. त्यावरून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रीय देताना ते खरंच दोषी असतील तर त्यांच्यासह पूर्ण कुटुंबाची मालमत्ता जप्त करावी. दोषी असणाऱ्या स्लीपर सेलवर गुन्हा दाखल करावी अशी मागणी केली आहे. तर जसे अनेक गुन्ह्यांमध्ये नंतर लोकं सुटली आहेत तसं ते निर्दोष सुटू नये. तसेच त्यांना या प्रकरणात दोषी बनवून अडकवण्याचे प्रयत्न तर केले जात नाहीत ना, हे सुद्धा बघण्याचं काम शासनाचं करावं अशी मागणी देखिल त्यांनी केली आहे.
Published on: May 17, 2023 07:27 AM
Latest Videos