महाराष्ट्रातील ‘हे’ शहर ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर
Hottest city in the country Chandrapur : महाराष्ट्रातील या शहरात पारा 42 पार; नागरिकांचे हाल, पाहा व्हीडिओ...
चंद्रपूर : चंद्रपुरात उन्हाची रखरख वाढली आहे. वादळ आणि अवकाळी पावसानंतर 42.8 डिग्री सेल्सियस उच्चांकी तापमान नोंदलं गेलं आहे. उन्हाची झळ बसू नये, म्हणून नागरिक काळजी घेऊ लागले आहेत. मात्र अचानक यात वाढ झाली आहे. 43.8 अंश एवढं उच्चांकी तापमान नोंदवलं गेलं आहे. चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून गणलं गेलं आहे. चंद्रपुरात पारा वाढू लागल्यानंतर नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःची काळजी घेण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. शहराच्या विविध भागात दुपारी बारा ते चार शुकशुकाट दिसू लागलाय. नागरिकांनी शीतपेये- उसाचा रस यासह लिंबू पाण्याचा आधार घेणं सुरू केलं आहे.
Published on: Apr 20, 2023 01:40 PM
Latest Videos