डी-मार्टला वस्तू स्वस्त देणे का परवडतं, अफलातून बिझनेस मॉडेलची भन्नाट कहाणी

डी-मार्टला वस्तू स्वस्त देणे का परवडतं, अफलातून बिझनेस मॉडेलची भन्नाट कहाणी

| Updated on: Aug 17, 2024 | 2:06 PM

भारतीयांच्या हातात पैसा खुळूखुळू लागल्यानंतर एकाच छताखाली स्वस्ता मस्त दर्जेदार घरगुती वस्तू विकणाऱ्या डी-मार्टने भारतीयांच्या मानसिकतेचा अभ्यास करीत डी-मार्टची साखळी यशस्वीपणे उभी केली आहे. कसं आहे या कंपनीचं बिझनेस मॉडेल पाहा

डी-मार्टमध्ये घरात लागणाऱ्या ए टू झेड वस्तू एकाच छताखाली आणि स्वस्त मिळतात. डी-मार्टची कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचा जानेवारी 2023 चा नफा चौथ्या तिमाहीत 17 टक्के वाढून 690.41 कोटी रुपये झाला आहे. राधाकिशन दमानी यांनी ही कंपनी स्थापन केली. डी-मार्टचे बिझनेस मॉडेल रिटेल स्टोअर पेक्षा वेगळे आहे, डिमार्ट कंपनीचे शोरुम शहरापासून लांब आणि स्वत:च्या मालकीच्या जागेत असतात. तेथे कार पार्कींगला देखील जागा असते. जे शहरात असतात तेथे कार पार्किंग नसते. डी-मार्ट पुरवठादाराकडून अत्यंत स्वस्तात वस्तू विकत घेते. डिमार्टच्या वस्तू पटकन विकल्या जातात. त्यामुळे पुरवठादारांना त्यांचे पैसे लागलीच मिळतात. त्यामुळे ते अजून सवलत देतात. थेट उत्पादकांकडून माल खरेदी केल्याने वस्तू स्वस्त मिळते. त्यामुळे ग्राहकांना वस्तू स्वस्त मिळते.डीमार्ट विविध कंपन्याच्या वस्तू ठेवत असली तरी त्यात जास्त श्रेणी नसते. डी-मार्ट काही वस्तू स्वत:च्या ब्रॅंडने विक्री करते. दमानी यांनी 2002 मुंबईत पहिले डी मार्ट शोरुम उघडले होते.या कंपनीने घाई न करता हळहळू स्टोअर्स उघडली. देशात आज 300 हून अधिक स्टोअर असून 11 राज्यात डी-मार्टचा विस्तार झाला आहे. डी-मार्ट कंपनी शेअर बाजारात देखील लीस्टेड आहे.

 

Published on: Aug 17, 2024 02:01 PM