भाजपची अवस्था कशी? एक टीका करतो, दुसरा माफी मागतो, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

भाजपची अवस्था कशी? एक टीका करतो, दुसरा माफी मागतो, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Sep 23, 2023 | 11:26 PM

राज्यातील 62 हजार सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. मूठभर शिक्षण सम्राटांच्या फायदा करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्याने केलीय.

पुणे : 23 सप्टेंबर 2023 | राज्यातील 62 हजार सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. मूठभर शिक्षण सम्राटांच्या फायदा करण्यासाठी घेतला जात आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलीय. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांची भेट घेण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने आहेत तर यावर भाजपची भूमिका काय आहे हे भाजपने स्पष्ट करावं असे ते म्हणाले. आमदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी अजित पवार यांच्या बंगल्यातून फोन जात असल्याची आणि त्यांना निधी देण्याचा आमिष दाखवत असल्याची माहिती आपल्याकडे आहे. एक आमदार टीका करतो आणि प्रदेशाध्यक्ष माफी मागतो अशी सध्याची भाजपची अवस्था असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Published on: Sep 23, 2023 11:25 PM