कोटा न वाढवता OBC तून मराठा आरक्षणाला विरोध! नेमकं प्रकरण काय? पाहा स्पेशल रिपोर्ट
ज्या मराठ्यांची नोंद कुणबी अशी दिसतेय त्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देता येईल का? या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापना केलीय. पण ओबीसी कोट्याचा मार्ग काढण्याचं आव्हानही सरकार समोरच असेल.
मुंबई : 05 सप्टेंबर 2023 | मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांची आहे. मात्र, ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध केलाय. एक तर ओबीसीचा कोटा वाढवा. नाही तर ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही, असं ओबीसी नेते म्हणाले. तर, जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगेंनी उपोषण छेडलं आणि मराठ्यांकडून नवी मागणी समोर आली. निजामकाळात मराठवाड्यातील मराठ्यांची नोंद कुणबी अशी सापडलीय. त्यामुळं आम्हाला कुणबीचं जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंची आहे. विदर्भात मराठा-कुणबींना ओबीसीतून आरक्षण मिळते. मात्र कोटा न वाढवता ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा आणि शरद पवारांचाही विरोध आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण आरक्षण 62 टक्क्यांवर गेलंय. एससी समाज 13 %, एसटी 7%, ओबीसी 19 %, विशेष मागास प्रवर्ग 2 %, एनटी ब 2.5 % , एनटी क 3.5%, एनटी ड 2 % विमुक्त जाती अ 3 % असं आरक्षण आहे. आता जे ओबीसी आरक्षण चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय त्या 19 टक्के आरक्षणात जवळपास 350 जातींचा समावेश आहे. मग आता राज्यसरकार समोर मोठ आव्हान असणार आहे. या संकटातून सरकार कसा मार्ग काढणार? पाहा हा स्पेशल रिपोर्ट