Ajit Pawar | 55 वर्षांत बारामतीत किती तरी आले गेले, अजित पवार यांचा भाजपला टोला

Ajit Pawar | 55 वर्षांत बारामतीत किती तरी आले गेले, अजित पवार यांचा भाजपला टोला

| Updated on: Sep 09, 2022 | 2:18 PM

Ajit Pawar | गेल्या 55 वर्षांत बारामतीत किती तरी जण आले नी गेले, असा खरपूस समाचार अजित पवार यांनी भाजपचा घेतला.

Ajit Pawar | गेल्या 55 वर्षांत बारामतीत (Baramati) किती तरी जण आले नी गेले, त्याने काहीच फरक पडला नाही. या 55 वर्षांत अनेक लाटा आल्या नी गेल्या पण बारामतीचा गड अभेद्य राहिल्याचा दावा करत भाजपचे (BJP) बारामतीत कमळ फुलवण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेश विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला दिला आहे. बारामतीकरांना अशा लाटांची सवय आहे.

कोणाचंच बटन द्याबायचं हे माहिती आहे

जनतेला कोणाचं बटन कसं दाबायचं हे चांगलंच माहिती असल्याचे सांगत अजित पवारांनी बारामतीकरांचं कौतूक केलं. तसेच हे काम ते चोख बजावतात असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. जनता पुढील निवडणुकीतही राष्ट्रवादीलाच (NCP) कौल देतील याबद्दल तिळमात्र शंका नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Published on: Sep 09, 2022 02:18 PM