'निवडणूक आयोगाने काय काय खोटेपणा केला', 'या' खासदाराने पुरावे देत सांगितले

‘निवडणूक आयोगाने काय काय खोटेपणा केला’, ‘या’ खासदाराने पुरावे देत सांगितले

| Updated on: Feb 18, 2023 | 8:53 PM

सुप्रीम कोर्टात २१ पासून सुनावणी सुरु होत आहे. त्या सुनावणीला कशी बाधा येईल याचा प्रयत्न म्हणूनच हा खोटा निर्णय देण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

मुंबई : सीबीआय, ईडी या सारख्या संस्था आधीच केंद्र सरकार आणि मोदी यांच्या गुलाम झाल्या आहेत. त्यात आणखी एक निवडणूक आयोगाची भर पडली आहे. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड कशी झाली माहित आहे का ? तिकडे सेवानियुक्त झाले आणि इकडे नियुक्ती झाली. कारण, त्यांना त्यांची सेवा करायची आहे. सुप्रीम कोर्टात २१ पासून सुनावणी सुरु होत आहे. त्या सुनावणीला कशी बाधा येईल याचा प्रयत्न म्हणूनच हा खोटा निर्णय देण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. हा आरोप करताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Published on: Feb 18, 2023 08:53 PM