Special Report | पवारांच्या जवळचा नेता ईडीच्या रडारवर
अनिल देशमुख, नवाब मलिक, आणि आता माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडावरवर आहेत. वरळीतील सीजे हाऊसमधील त्यांचे चार प्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. गँगस्टर इक्बाल मिर्चीबरोबर प्रफुल्ल पटेल यांना आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर या व्यवहारात आर्थिक घोटाळा आणि जमिन घोटाळा झाला […]
अनिल देशमुख, नवाब मलिक, आणि आता माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडावरवर आहेत. वरळीतील सीजे हाऊसमधील त्यांचे चार प्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. गँगस्टर इक्बाल मिर्चीबरोबर प्रफुल्ल पटेल यांना आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर या व्यवहारात आर्थिक घोटाळा आणि जमिन घोटाळा झाला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सीजे हाऊसमधील चार मजले ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत, त्याचबरोबर त्यांच्या आधी ज्या इमारतीवर कारवाई करण्यात आली होती, त्या इमारतीत आता ईडीकडून झोन टू चे ऑफिस थाटण्यात आले आहे, त्यामुळे नाना पटोले यांनी भाजपवर टीका करत कारवाईच्या भीतीने जे भाजपात जातात, ते शुद्ध होतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Published on: Jul 21, 2022 09:40 PM
Latest Videos