मेगा ब्लॉकच्या दुसऱ्या दिवाशी कल्याण स्थानकावर प्रचंड गर्दी, व्हिडीओ पाहून…
मेगा ब्लॉकच्या दुसऱ्या दिवशी कल्याण स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी, स्टेशनवरील गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
मध्य रेल्वेच्या तीन दिवसाच्या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या 534 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्याने सुरू असलेल्या लोकल ट्रेनवर प्रवाशाचा ताण वाढला असून डोंबिवली व कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. दिवास्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाण्यासाठी लोकल ट्रेन कमी असल्याने लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेसवरून दिवा स्थानकावर आलेले प्रवासी दिवा ते कल्याण व कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा प्रवास करत आहेत. यामुळे कल्याण स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून पदचारी पुलावर देखील प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता लटकत प्रवास करावा लागत आहे.
Published on: Jun 01, 2024 01:40 PM
Latest Videos