प्रकाश आंबेडकर जरा तोंड सांभाळून, जितेंद्र आव्हाड यांनी का दिला इशारा?
शरद पवार यांच्याबद्दल बोलताना कुणीही असो त्यांनी सांभाळून बोलावे. त्यांच्याइतका राजकारणात भीष्म पितामह कुणीही नाही.
ठाणे : आनंद दिघे ( ANAND DIGHE ) हे अक्ख्या ठाण्याचे नेते आहेत. मी ही ठाण्यातच राहतो. त्यामुळे त्यांचे बॅनर लावण्यात गैर काय? उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. गेली अडीच वर्ष मी त्यांना जवळून पहिले आहे. त्यांच्यामध्ये मानवी संस्कृती आणि मानवी प्रेमाचे झरे आहेत. हे मी अनुभवले आहे.
वंचित आणि शिवसेना यांची आघाडी झाली. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहेच. पण, प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केले आहे ते सहन केले जाणार नाही. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना कुणीही असो त्यांनी सांभाळून बोलावे. त्यांच्याइतका राजकारणात भीष्म पितामह कुणीही नाही. पण गेली ३५ वर्ष मी शरद पवार यांच्यावर झालेली टीका सहन केली नाही तर आता काय करणार? यापुढे बोलताना त्यांनी सांभाळून बोलावे, असा इशारा माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.