Virar Hospital Fire | विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच कोरोनाबाधित पत्नीनेही प्राण सोडले

| Updated on: Apr 23, 2021 | 7:02 PM

आगीत पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कोरोनाग्रस्त पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. (Husband dies in Virar fire; Upon hearing the news, Corona's wife also died)

मुंबई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कोरोनाग्रस्त पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे.