मी पण आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही; अजित पवारांचा मोदींना खोचक टोला 

मी पण आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही; अजित पवारांचा मोदींना खोचक टोला 

| Updated on: Sep 25, 2022 | 1:14 PM

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मी पण बारामतीमध्ये येतो, आईला भेटतो मात्र मी कधी फोटो काढला नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.

बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मी पण बारामतीमध्ये (Baramati) येतो, आईला भेटतो मात्र मी कधी फोटो काढला नाही असं अजित पवार म्हणाले आहेत. आताही सभा संपल्यावर आईला भेटायला जाणार आहे, मात्र फोटो काढणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच यावेळी बोलताना आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत, त्या योग्य पद्धतीने पार पाडा असा सल्लाही आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही मला मुंबईत पाठवलं मग  मी काय रडत बसलो का नाही, तर मी मुंबईत राहून माझी जबाबदारी पार पाडत आहे. आपल्यावर आपले वरिष्ठ, सहकारी आणि इतर कोणी जी जबाबदारी सोपवतील ती पूर्ण करावीच लागते.

 

 

 

 

Published on: Sep 25, 2022 01:08 PM