‘मी शरद पवार यांचा अपमान करुच..,’ काय म्हणाले अजितदादा पवार
लोकसभेला चुकीच्या नरेटिव्हमुळे फटका बसला होता. अल्पसंख्याक घाबरले होते, परंतू हे चुकीचे आहे हे सांगायला आम्ही कमी ठरलो. आता विधानसभेची निवडणूक आहे. आता गरीब माणूस आणि माणूस महत्वाचा आहे. आपल्याला विकास करायचा असून निगडी ते कात्रज मेट्रोचे काम हाती घेतली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात काल डीपीडीसीची बैठक झाली. या बैठकीला काका आणि पुतण्या एकमेकांसमोर बसले होते. ही बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मावळमध्ये जास्त दिले असं सुप्रिया सारख्या बोलत होत्या. मावळ पण आपलंच आहे. मावळमध्ये जास्त दिला. सुनील शेळके त्यांना म्हणाले की सारखं मावळ मावळ काय बोलताय ?…मावळ येथे जरा काम करायची राहीली होती,लोणावळ्यात काम करायची होती, त्यामुळे जरा निधी जास्त दिला होता. परंतू काल सुप्रिया यांनी आरोप केला की अजितदादांनी शरद पवार यांचा अपमान केला. मी कशाला अपमान करु. शरद पवार यांचा मी अपमान केलेला नाही आणि करणार पण नाही. काय गरज काय? त्यांनी मी अनेक वर्षे दैवत मानत होतो. कोल्हे पण म्हणाले की आम्हाला निधी दिलेला नाही. डीपीडीसीचे काम कसे चालते हे तुम्हाला माहीती आहे. आमदार पण निमंत्रित असतात खासदार पण निमंत्रित असतात. मी कधी फार भेदभाव करणारा नेता नाही. महापालिकेत आपले बहुमत असले तरी विरोधकांची देखील मी कामे करीत असतो असेही अजित पवार यांनी सांगितले. पण काही तरी खोटं नरेटिव्ह सेट करायचं काम सुरु असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.