Sharad Pawar: मला त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही,  या एका वाक्यात शरद पवार यांनी राज ठाकरे यांचा विषय निकाली

Sharad Pawar: मला त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही, या एका वाक्यात शरद पवार यांनी राज ठाकरे यांचा विषय निकाली

| Updated on: May 22, 2022 | 5:50 PM

राज ठाकरे यांच्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच आपण बोलून अधिक महत्त्व द्यायचे नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला आहे.

पुणे-  मला त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही, असे म्हणत एका वाक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांचा विषय बोलणे थांबवले आहे. ते पुण्यात बोलत होते. राज ठाकरे यांची पुण्यात सभा झाली. यावेळी सुरुवातीलाच त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख न करता त्यांना टोला लगावत भाषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर औरंगजेब (Aurangzeb) कबर आणि इतर मुद्द्यांवरून त्यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याविषयी शरद पवार यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच आपण बोलून अधिक महत्त्व द्यायचे नाही, असा टोलाही लगावला आहे. पुण्यात पुस्तक प्रकाशन समारंभास आले असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली पण अधिक बोलण्यास मात्र नकार दिला.