Dada Bhuse | मी मुख्यमंत्र्यांकडे वेगळ्या खात्याची मागणी केली होती, दादा भूसे यांनी केली नाराजी व्यक्त
Dada Bhuse | मी मुख्यमंत्र्यांकडे वेगळ्या खात्याची मागणी केली होती,अशी नाराजी दादा भूसे यांनी व्यक्त केली आहे.
Dada Bhuse | मी मुख्यमंत्र्यांकडे वेगळ्या खात्याची मागणी केली होती,अशी नाराजी दादा भूसे (Dada Bhuse) यांनी व्यक्त केली आहे. खातेवाटपावरुन कुठलीही नाराजी नसल्याचे शिंदे आणि फडणवीस सरकार किती ही ठासून सांगत असले तरी ही सगळंच काही अलबेल नसल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे. प्रकृतीच्या कारणावरुन वेगळ्या खात्याची मागणी केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच प्रकृती अस्वास्थ्याचे कारण हल्लीचे नसून गेल्या मंत्रिमंडळात असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्याकडे आपण खाते बदलून देण्याची मागणी केली होती. ही मागणी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या माध्यमातून केल्याचे त्यांनी सांगितले. प्रवासामुळे शारिरीक थकवा जाणवत असल्याने खाते बदलून देण्याची विनंती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्यावर जी जबाबदारी दिले जाते, तिला न्याय देता आला पाहिजे असी पुस्तीही त्यांनी जोडली.