लाथ मारण्याची गरज नाही, 16 नोव्हेंबरलाच मी राजीनामा दिला, छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

लाथ मारण्याची गरज नाही, 16 नोव्हेंबरलाच मी राजीनामा दिला, छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Feb 03, 2024 | 9:13 PM

छगन भुजबळ यांची नगर येथील ओबीसी मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. यावेळी आपल्याला सरकारमधील मंडळींनी लाथ मारुन भुजबळला हाकला असे म्हटले आहे. याबाबत मी सांगू इच्छीतो की आपण तर 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

नगर | 3 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लाखोंचा मार्चा मुंबईच्या वेशीवर आणला. त्यानंतर राज्य सरकारने सगेसोयरेचा अध्यादेश काढून मराठा समाजाला दिलासा दिला. त्यामुळे जरांगे यांनी तूर्त आपले आंदोलन मागे घेतल्याचे सांगितले. त्यानंतर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी सगेसोयरेच्या अध्यादेशावर आक्षेप घेत त्यावर हरकती उपस्थित करीत कोर्टात त्यास आव्हान देण्याची घोषणा केली. यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांना लाथ मारुन मंत्रिमंडळातून काढू टाकण्याची मागणी केली. यावर शनिवारी नगर येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोट केला. पहिली ओबीसी रॅली 17 नोव्हेंबरला अंबड येथे झाली. त्याआधी 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता असे सांगत भुजबळांनी मला लाथ मारण्याची गरज नाही मी आधीच राजीनामा दिला आहे. केवळ मुख्यमंत्र्यांनी सांगितले म्हणून मी दोन महिने शांत होतो असेही भुजबळ यांनी सांगितले.

 

Published on: Feb 03, 2024 09:12 PM