माझी भूमिका लवकरच जाहीर करेन, राजीनाम्यानंतर Rupali Patil यांची प्रतिक्रिया
मागील 14 वर्षांपासून मनसेच्या रणरागिणी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रुपाली पाटील आता कोणत्या पक्षात जातील, याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, ज्या पद्धतीनी मी काम करत होते, त्या पद्धतीनीच मला जर राष्ट्रवादी किंवा शिवसेने स्वीकारलं तरच मी जाईन.
मागील 14 वर्षांपासून मनसेच्या रणरागिणी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रुपाली पाटील आता कोणत्या पक्षात जातील, याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, ज्या पद्धतीनी मी काम करत होते, त्या पद्धतीनीच मला जर राष्ट्रवादी किंवा शिवसेने स्वीकारलं तरच मी जाईन. मनसेच्या ज्या मुशीत मी वाढलीय, त्या पद्धतीनेच जे मला स्वीकारतील त्याच पक्षात मी प्रवेश करेन. अन्यथा सध्या तरी मी माझ्या झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने काम करत राहीन,” असं वक्तव्य रुपाली पाटील यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना या दोन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करेन, असे संकेत रुपाली पाटील यांनी दिले. पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आणि शिवसेनेचे नेते वरुण देसाई यांचीही सदिच्छा भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.