Nagpur | Special Report | स्मशानातील वेटिंगवर ICR च्या ‘दहन पेटी’चा उपाय

| Updated on: May 08, 2021 | 7:34 PM

Nagpur | Special Report | स्मशानातील वेटिंगवर ICR च्या 'दहन पेटी'चा उपाय (nagpur new techniques cremation)

नागपूर : नागपुरात कोरोनाची भयावह स्थिती आहे. वाढत्या मृत्यूसंख्येमुळे शहरातील काही स्मशानभुमीत अत्यंसस्कारासाठी 5 ते 10 तासांचं वेटिंग आहे. यावर उपाय म्हणून लवकरात लवकर प्रेतांचं दहन व्हावं, म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कापूस संशोधन केंद्रानं ‘दहन पेटी’ संशोधीत केलीय. ICR च्या संसोधनानुसार नागपूरातील विदर्भ सेल्स कंपनीनं ही दहन पेटी तयार केलीय. गोवऱ्या आणि कपाशीपासून तयार केलेल्या ब्रिकेट्सच्या माध्यमातून दहन प्रकिया केली जाणार आहे. यामुळे लाकडांची बचत होणार आहे. पारंपरिक पद्धतीनं अंत्यविधी केल्यास 10 तासांचा वेळ लागतो, पण दहन पेटीमुळे निम्मा वेळ वाचणार आहे. शिवाय खर्चातंही बचत होणार आहे. नागपूर मनपाने अंबाझरी घाटावर ही दहन पेटी लावण्यात आलीय. यामुळे स्मशानभुमीतील वेटिंग कमी होण्यास मदत झालीय.