मी मुख्यमंत्री असतो तर… प्रकाश आंबेडकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला
औरंगजेब याने इथे राज्य केले हे सत्य बदलणार आहे का? जयचंद इथे आले आणि झाले राज्याराज्यामध्ये. त्यांना शिव्या घाला ना. जयचंद यांनी राजांचे राजवाडे बुडवले त्यांना शिव्या घालायची हिंमत नाही. आता जे जयचंद ह्यांची औलाद आहे त्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत.
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील औरंगजेब समाधीला भेट दिली. औरंगजेबावरून राज्यात वातावरण तापलेले असतानाच आंबेडकर यांच्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चानी जोर धरला आहे. मात्र यावर प्रकाश आंबेडकर यांनी लोकांची श्रद्धा आहे त्याचा आपण मान ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. खुलताबाद हे ऐतिहासिक गाव आहे. औरंगजेब याने इथे राज्य केले हे सत्य बदलणार आहे का? जयचंद इथे आले आणि झाले राज्याराज्यामध्ये. त्यांना शिव्या घाला ना. जयचंद यांनी राजांचे राजवाडे बुडवले त्यांना शिव्या घालायची हिंमत नाही. आता जे जयचंद ह्यांची औलाद आहे त्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत. त्यांच्यामुळे देश गुलाम झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे जे हिंदुत्व आहे ते प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व आहे. नंतर बाळासाहेबांना सत्तेसाठी जे हवे ते केले. आता शिवसेनेकडे पुन्हा तेच हिंदुत्व आहे. औरंगजेब वरून राज्यात ठिकठिकाणी वाद झाले. पण, माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर दोन दिवसात सारे निपटून टाकलं असते, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.