नाम्या जाधव माफी मागितली नाही तर… राष्ट्रवादीने दिला पुन्हा इशारा
आता आम्हाला जेलमध्ये पाठवतील. तर आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत. नाम्या जाधव याने शरद पवार यांची माफी मागितली नाही. इथून पुढे टीका केली तर तो जिथे जिथे सापडेल तिथे तिथे त्याला काळे फासू असा इशाराही जगताप यांनी दिला.
पुणे | 18 नोव्हेंबर 2023 : नामदेव जाधव हा पिसाळलेला व्यक्ती आहे. मनोविकृत माणूस आहे. तो शरद पवार यांच्यावर जे काही आरोप करत आहे. त्याचे पुरावे त्याच्याकडे असतील तर त्याने ते सादर करावे. पण, तो सातत्याने पवार साहेबांची बदनामी करत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा उभा संघर्ष निर्माण करत आहे. एक उच्चपदस्थ मंत्री त्यासाठी प्रयत्न करत आहे असा आरोप शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. नामदेव जाधव यांना आम्ही दहा दिवसांपूर्वी इशारा दिला होता. असे असताना तो पुण्यात आला. भांडारकर येथे त्याचा कार्यक्रम होता. पण, पोलिसांनी त्याची परवानगी नाकारली. तरीही तो पुण्यात फिरत होता. तो सापडला आणि म्हणून त्याला आम्ही काळे फासले. याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. सरकारला विनंती आहे की असे काही राजकारण करू नका. अस्मिता तोडण्याचा प्रयत्न करू नका. आता आम्हाला जेलमध्ये पाठवतील. तर आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत. नाम्या जाधव याने शरद पवार यांची माफी मागितली नाही. इथून पुढे टीका केली तर तो जिथे जिथे सापडेल तिथे तिथे त्याला काळे फासू असा इशाराही जगताप यांनी दिला.