निकाल दोन दिवसांवर असताना स्पीकर भेटायला जातो, लोकांना शंका आली तर…शरद पवार यांची पहिली प्रतिक्रीया
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना आहे असा निकाल दिला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. पाहा शरद पवार काय म्हणाले ते....
मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. या निकालात विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. निकालाच्या दोन दिवस आधी विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदे यांना भेटायला जातो. याचा काय अर्थ होतो. न्यायाधीशाकडे एखाद्याची केस असेल आणि न्यायाधीशच जर आरोपीला भेटायला गेले तर ? जनतेला तरी यावर विश्वास बसेल काय ? ते म्हणतात मतदार संघाच्या कामासाठी भेटायला गेलो. पक्षातील कामे आताच आठवली का ? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा कोणताही आधार यात दिसत नाही. या निकालाची पुनरावत्ती होण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी बाबत ही असाच निकाल लागेल का असा सवाल करताच शरद पवारांनी निकाल तर लागू होऊ द्या असे उत्तर दिले.