राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन हे...काय म्हणाले किरीट सोमय्या

राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन हे…काय म्हणाले किरीट सोमय्या

| Updated on: Sep 26, 2024 | 2:08 PM

संजय राऊत यांना महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दीड वर्षांच्या सुनावणीनंतर विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी राहुल गांधींना न्यायालयाने निवडणूकांच्या वेळी दोषी ठरवले तसे मलाही निवडणूकांच्या वेळी दोषी ठरवले असल्याचा आरोप केला आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या संदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला होता. या निकालानंतर संजय राऊत यांनी मीडीयाशी बोलताना न्यायालयाचे संघीकरण झाले आहे. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर जाणून बुजून हा निकाल दिला असल्याचा आरोप केला आहे. यावर भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत नुसते वेगवेगळे दावे करीत असतात. आमच्यावर शंभर कोटीच्या शौचालय भ्रष्टाचार आरोप केला परंतू एकही कागदपत्र आणू शकले नाही. मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आव्हान देतो की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर याचिका दाखल करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदक खायला तुमच्या घरी गेल्याने न्यायालय असे निकाल देत असा उल्लेख अपिल याचिकेत करावाच असे  किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हटले आहे.

Published on: Sep 26, 2024 02:08 PM