Anil Deshmukh | कागदपत्र दिल्यास अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहणार, वकिलांची माहिती
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी अनिल देशमुख दाखवली आहे.
ईडीने शनिवारी (25 जून) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. यानंतर रविवारी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यांची 10 तास चौकशी केल्यानंतर रात्री साडेबारा वाजता दोघांना अटक करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली. यानंतर अनिल देशमुख यांना तात्काळ चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता.त्यानंतर देशमुखांच्या वकिलांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना योग्य कागदपत्र दिल्यास अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहणार असून आम्ही ईडीच्या कारवाईला पूर्ण सहकार्य करु असंही सांगितल.