यापुढे जर महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटना घडल्या तर..संजय राऊत यांनी काय दिला इशारा

यापुढे जर महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटना घडल्या तर..संजय राऊत यांनी काय दिला इशारा

| Updated on: Aug 24, 2024 | 2:39 PM

महा विकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद विरोधात कोर्टात सरकारला विशेषत:फडणवीसांना मदत करणाऱ्या सदा आवडत्या व्यक्तीने याचिका केल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीने बदलापूर येथील बालिकांवर अत्याचार घटनेत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात झालेल्या दीरंगाई आणि त्यानंतर रेल्वे ट्रॅकवर झालेल्या आंदोलनात आंदोलकांवर झालेल्या लाठीमार आणि कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणात कोर्टात धाव घेतली आणि त्यानंतर हा बंद बेकायदेशीर ठरविण्यात आला. या प्रकरणात शनिवारी मविआच्या नेत्यांनी राज्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलन केले. त्यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केले. हा काय राजकीय बंद नव्हता. आज हा बंद शंभर टक्के यशस्वी होणार होता,राज्य सरकारला याचा फटका बसला असता. त्यामुळे राज्य सरकारला वाचविण्यासाठी विषेशत: देवेंद्र फडणवीसांना मदत करणारा सदा आवडत्या व्यक्तीने याचिका केली. कोर्टाने याचिकाकर्ते कोण आहेत. त्यांचा पूर्वइतिहास काय आहे हे पाहायला हवे होते. ठीक आहे. यापुढे जर महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटना घडल्या तर त्याची जबाबदारी आता कोर्ट आणि या याचिकाकर्त्यावर असेल असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

 

Published on: Aug 24, 2024 02:39 PM