हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा : Kirit Somaiya
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्यावर तोफ डागली आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्यावर तोफ डागली आहे. खरमाटे आणि सचिन वाझेंकडून (sachin waze) पैसे घेतले आणि रिसॉर्ट बांधलं. कोरोनाच्या नावाखाली यांच्या सरकारने लॉकडाऊन लादला आणि घोटाळा केला. त्यामुळे परबांनो, बॅग भरा, तयारी करा, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. त्यामुळे अनिल परब यांना अटक होणार का? याबाबतचे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. तसेच हसन मुश्रीफ आणि अनिल परब यांचा आता नंबर लागणार असल्याचा दावाही सोमय्या यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे येत्या काळात परब आणि मुश्रीफ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
Latest Videos