Ashok Chavan on Abdul Sattar | सत्तार यांची भेट घेतली, तर काय अनुचित केलं? सत्तार यांच्या भेटीवरुन अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण

Ashok Chavan on Abdul Sattar | सत्तार यांची भेट घेतली, तर काय अनुचित केलं? सत्तार यांच्या भेटीवरुन अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण

| Updated on: Aug 22, 2022 | 5:49 PM

Ashok Chavan on Abdul Sattar | सत्तार यांच्या भेटीवरुन काँग्रेस पक्षातंर्गत आणि बाहेर सुरु असलेल्या वावड्यांना काही अर्थ नसल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Ashok Chavan on Abdul Sattar | कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी जूने सहकारी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट घेतली. या भेटीवरुन काँग्रेस पक्षातंर्गत (Congress) आणि बाहेर ही कुजबूज सुरु झाली. याविषयी पत्रकारांनी त्यांना आज प्रश्न केला असता, भेट घेतली तर काय अनुचित झालं, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. अब्दुल सत्तार हे जूने मित्र असून मुख्यमंत्री असताना ते आपल्या मंत्रिमंडळात असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली. तसेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी भेट दिली तर त्यात काय वावगे झाले असा प्रश्न ही त्यांनी केला. असे प्रश्न का पसरवण्यात येत आहे, असा सवाल ही त्यांनी केला. तसेच सत्तार यांच्याशी जिल्ह्यातील प्रश्नांवर चर्चा झाली, राजकीय चर्चा झाली नसल्याची पुस्ती ही त्यांनी जोडली.

Published on: Aug 22, 2022 05:49 PM