संजय राऊत म्हणाले, पुढील लढाया जिंकायच्या असतील तर तोच
विधान परिषद निवडणुकीत झालेला गोंधळ नाकारू शकत नाही. काँग्रेसबाबत घटना घडली असली तरी महाविकास आघाडी म्हणून त्याकडे पहायला हवे.
मुंबई : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडीची एकत्रित चर्चा होणे गरजेचे होते. नाशिक, नागपूर, अमरावतीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता. नाशिकचे तांबे कुटुंब हे काँग्रेसचे निष्ठावंत कुटुंब आहे.
राहुल गांधी ज्यांच्या घरी जेवले, राहिले त्यांच्यावर कोण अविश्वास दाखवणार? तांबेंनी काय निर्णय घेतला हे त्यांच्या नेतृत्वाला माहीत नसेल तर त्याला काय करणार? पण जे घडलं ते घडलं. अशा उलट्यापालट्या सर्वच पक्षात होत असतात.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आपण कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चालवलं. तेव्हा उत्तम समन्वय होता. हाच समन्वय विरोधी पक्षात असतानाही असायला हवा. तोच समन्वय तोच एकोपा असेल तरच पुढील लढाया जिंकू शकतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Published on: Jan 14, 2023 11:48 AM
Latest Videos