Nashik Unseasonal Rain : बळी राजावर आस्मानी संकट; शेतात आता होत ते नव्हतं झालं

Nashik Unseasonal Rain : बळी राजावर आस्मानी संकट; शेतात आता होत ते नव्हतं झालं

| Updated on: Apr 16, 2023 | 9:28 AM

अनेक ठिकाणी शेतात गारांचा खच पडल्याने भाजीपाला, गहू, मका, जणांवराचा चारा इत्यादींचे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात नुकसान झाले आहे. तर नाशिकच्या सटाणा डांगसौंदाणे , अंबासन, मोराणे, सारदे, बिजोरसे परीसरात धुव्वांधार पावसासह गारपीट झालेली आहे

मालेगाव : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्याचा टाहो फोडणारा व्हीडिओ व्हायरल होत असतानाच आता मालेगावातील नुसकान देखील समोर आले आहे. बळीराजावर आस्मानी संकट कोसळलं असून नाशिकसह मालेगावला पुन्हा एकदा अवकाळी पावसाबरोबर जोरदार गारपिटीने झाडपले आहे. त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शेतात गारांचा खच पडल्याने भाजीपाला, गहू, मका, जणांवराचा चारा इत्यादींचे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात नुकसान झाले आहे. तर नाशिकच्या सटाणा डांगसौंदाणे , अंबासन, मोराणे, सारदे, बिजोरसे परीसरात धुव्वांधार पावसासह गारपीट झालेली आहे. ज्यामुळे काढलेला कांदा, टोमॅटो, मिरची सह भाजीपाला पिके भुईसपाट झालेली पहायला मिळत आहेत.

Published on: Apr 16, 2023 09:28 AM