राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर सांगलीतील ‘ते’ वादग्रस्त बांधकाम अखेर जमीनदोस्त
VIDEO | सांगलीतील कुपवाड येथे शाळेची जागा असताना त्या ठिकाणी अनधिकृत मशिदीचं बांधकाम करण्यात आलं होतं. अखेर राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सांगलीतील हे बांधकाम हटवले
सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील सभेच्या भाषणात उपस्थित केलेल्या सांगलीतील अनधिकृत मशिदीचे बांधकाम अखेर काल जमिनदोस्त करण्यात आले आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण पथकाने त्या जागेवरील बांधकाम पाडले आहे. सांगलीतील कुपवाड येथे शाळेची जागा असताना त्या ठिकाणी अनधिकृत मशिदीचं बांधकाम करण्यात आलं होतं. अखेर राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सांगलीतील हे बांधकाम हटवण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणा सांगलीतील जुना कुपवाड रोडवरील मंगलमूर्ती कॉलनी येथील बेकायदेशीररित्या मशीद उभारण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होत्या. त्यानंतर सांगली महापालिकेच्या विभागाकडून या ठिकाणी सदर जागेची पाहणी करण्यात आली. महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी या जागेवर बांधण्यात येणारे बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले आणि त्यावर कारवाई करण्यात आली.