Bhiwandi Heavy Rain : भिवंडीत मध्यरात्रीपासून पावसाची बॅटिंग, बाजारपेठच पाण्याखाली अन् अर्धी दुकानंही बुडाली

| Updated on: Jun 20, 2024 | 12:28 PM

भिवंडीतील सखल भागात पावसाचं पाणी साचताना दिसतंय. यासोबत गुडघाभर पाणी साचल्याने भिवंडीतील बाजारपेठ आणि दुकानं काहिशी पाण्यात गेली असून दुकानदारांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे बाजारपेठच पाण्याखाली गेल्यानं भाजीपाल्याचं आणि फळभाज्यांचंही मोठं नुकसान झालंय

Follow us on

कल्याण, डोंबिवली या शहरासह आता भिवंडीतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने चांगलाच जोर धरला असून सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. या पावसामुळे कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत झाली आहे. आज मध्यरात्रीपासून पावसाने मोठा जोर धरला आहे. त्यामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे भिंवडीत बाजारपेठच पाण्याखाली गेली आहे. तर भिवंडीतील सखल भागात पावसाचं पाणी साचताना दिसतंय. यासोबत गुडघाभर पाणी साचल्याने भिवंडीतील बाजारपेठ आणि दुकानं काहिशी पाण्यात गेली असून दुकानदारांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे बाजारपेठच पाण्याखाली गेल्यानं भाजीपाल्याचं आणि फळभाज्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. सकाळी बाजारपेठेत भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे.