Rain Update : आला रे आला Monsoon महाराष्ट्रात आला, हवामान विभागाने काय दिलं मोठं अपडेट?

| Updated on: Jun 06, 2024 | 2:14 PM

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्याने बळीराजाची चिंता मिटणार आहे. तर नागरिकांसह विशेषतः शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मान्सून सक्रिय झाला आहे. कालपासूनच रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कालपासून पावसाला सुरूवात झाली आहे.

Follow us on

पावसाची प्रतीक्षा असणाऱ्या मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून कोकणात मान्सूनच्या सरींना आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्याने बळीराजाची चिंता मिटणार आहे. तर नागरिकांसह विशेषतः शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मान्सून सक्रिय झाला आहे. कालपासूनच रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कालपासून पावसाला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे मान्सून गोवा राज्यापर्यंत दाखल झाला आहे. शनिवारपर्यंत पाऊस रत्नागिरीत दाखल होणार असून मान्सून सक्रिय होण्यासाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. याचसोबत तळ कोकणात उद्यापर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे. कोकणासाठी आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून अरबी समुद्र किनारपट्टी भागात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर ऊन आणि सावलीचा खेळ सुरू झालाय. तर कोकणात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशाराीही देण्यात आला आहे.