Kokan Rain Update : सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्…

| Updated on: Jul 18, 2024 | 5:38 PM

हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजपासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०० मिमी पाऊस पडला. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सावंवाडीतील तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

Follow us on

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधून मधून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजपासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०० मिमी पाऊस पडला. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सावंवाडीतील तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यासोबत वेंगुर्ला येथील होडवडा पुलावरून पाणी गेल्याने येथील वाहतूक सावंतवाडी मार्गे वळविण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्टच्या पार्श्भूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडलेली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही पाणी असलेल्या रस्त्यांवरून, पुलावरून वाहतूक करू नये, तसेच नदीचे, पुराचे पाण्यात जावू नये असं आवाहन करण्यात आले आहे.