आला रे आला Monsoon केरळात आला, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री

| Updated on: May 30, 2024 | 11:50 AM

मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, हवामान विभागाने अशी महत्त्वाची माहिती दिली आहे. उत्तर - पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. तर पुढील १० दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यासोबतच या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Follow us on

कडाक्याच्या उन्हाळ्यात हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनची एन्ट्री आता भारतात झाली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, हवामान विभागाने अशी महत्त्वाची माहिती दिली आहे. उत्तर – पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. तर पुढील १० दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ही महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी सुखद आणि आनंदाची बातमी आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळणार आहे. यासोबतच हवामान विभागाने या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर फारसा परिणाम होणार नाही, मान्सूनसाठी सध्या पोषक स्थिती कायम आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी दिली होती. तर येत्या तीन ते चार दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाजही नागपूर हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार मान्सूनची एन्ट्री झाली आहे.