Weather Update | मुंबई आणि शेजारील जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस? हवामान खात्याचा अंदाज काय?
VIDEO | मुंबई आणि शहरामध्ये हवामान खात्याकडून सोमवारपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोमवारपर्यंत मुंबई आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, १५ सप्टेंबर २०२३ | हवामान खात्याकडून मुंबई आणि शहरामध्ये सोमवारपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशा राज्यावर सध्या निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता मुंबई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने गुरूवारी जाहीर केलेल्या पाच दिवसांच्या बुलेटिन अंदाजात भारतीय हवामान खात्याने येल्लो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत मुंबई आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घ्या तुमच्या शहरात पावसाची स्थिती काय असणार? काय वर्तविला हवामान खात्याने मुंबई शहरासंदर्भात पावसाचा अंदाज?
Published on: Sep 15, 2023 12:37 PM