Weather Update IMD : महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात…

| Updated on: Mar 29, 2025 | 5:34 PM

भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्र आणि मुंबईकरता हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील 4 ते 5  दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यासाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्रासाठी पुढील 4 ते 5 दिवस हे थोडे गैरसोयीचे असणार आहे. कारण येत्या चार ते पाच दिवसात राज्यात हलक्या पावसाच्या सरी बसरणार असल्याची माहिती मिळतेय. येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असून मुंबईत देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून ही मोठी माहिती देण्यात आली आहे. यासह येत्या सोमवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.  भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5  दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. विशेषतः सोमवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटची शक्यता असून मुंबईत हलका, गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

Published on: Mar 29, 2025 05:34 PM
Manoj Jarange : ‘कुत्रे अन् मांजरांवरून जातीय तेढ..’, वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरील वादात जरांगे पाटलांचं भाष्य
Nagpur News : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी