मुख्यमंत्री चारधाम यात्रेलाही जातील!, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा एकनाथ शिंदेंना टोला

“मुख्यमंत्री चारधाम यात्रेलाही जातील!”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा एकनाथ शिंदेंना टोला

| Updated on: Oct 26, 2022 | 1:04 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे चारधाम यात्रेलाही जातील, असं काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार इमरान प्रतापगढी (Imnran Pratapgadhi) यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चारधाम यात्रेलाही जातील. भाजपने त्यांची अशी स्थिती केली आहे की शिंदे चारधाम यात्रेलाही जातील. असा हल्लाबोल इमरान प्रतापगढी यांनी केला आहे. मलिकार्जुन खरगे यांचं महाराष्ट्राशी वेगळं नातं आहे. ते महाराष्ट्राचे प्रभारीही राहिले आहेत. याचा आम्हाला आनंद आहे, असंही प्रतापगढी म्हणालेत.