इम्रान खान यांना पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचा दणका, 9 एप्रिलला अविश्वास प्रस्तावावर मतदान
इम्रान खान सरकारच्या अडचणी आणखी या निर्णयाने वाढल्या आहेत. अविश्वास प्रस्तावावर 9 एप्रिलला मतदान घेतलं जाणार आहे. नव्यानं निवडणुका घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
पाकिस्तान ससंदेच्या उपाध्यक्षांचा निर्णय हा बेकायदेशीर आहे असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. इम्रान खान सरकारला हा मोठा झटका आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आजच्या निकालाकडे लागले होते. इम्रान खान सरकारच्या अडचणी आणखी या निर्णयाने वाढल्या आहेत. अविश्वास प्रस्तावावर 9 एप्रिलला मतदान घेतलं जाणार आहे. नव्यानं निवडणुका घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. इमरान खान यांना अविश्वास प्रस्तावाच्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. 90 दिवसांत निवडणुका घेण्याचा निर्णयही रद्दबातल ठरवण्यात आला आहे. या निर्णयानं आता इमरान खान यांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण जगाचं लक्ष पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलेलं होतं. या निर्णयाआधी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, त्यानंतर इम्रान खान यांना दणाका देणारा हा मोठा निर्णय समोर आला आहे.
Latest Videos