Imtiyaz Jaleel on CM Sabha | मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं स्वागत! पण पाणी प्रश्नावरुन इम्तियाज जलील यांची खोचक टीका
सर्वात महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. त्यासाठी मी एक पत्र लिहिलं होतं. पण मुख्यमंत्री जे बोलले त्यावरुन येत्या दोन वर्षात औरंगाबादला पाणी मिळणार नाही. अजून तीन वर्षे तरी औरंगाबादला पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे, अशी टीकाही जलील यांनी केलीय.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबादेतून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. औरंगाबादच्या पाणी प्रश्नापासून ते काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यापर्यंत अनेक विषय उद्धव ठाकरे यांनी हाताळले. महत्वाची बाब म्हणजे भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजपवर टीकास्त्र डागलं. तसंच बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुसलमानांचा द्वेष करा असं सांगितलं नाही, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचं स्वागत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. मात्र, औरंगाबादच्या पाण्याच्या प्रश्नावरुन जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. सर्वात महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. त्यासाठी मी एक पत्र लिहिलं होतं. पण मुख्यमंत्री जे बोलले त्यावरुन येत्या दोन वर्षात औरंगाबादला पाणी मिळणार नाही. अजून तीन वर्षे तरी औरंगाबादला पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे, अशी टीकाही जलील यांनी केलीय.