“…तर प्रकाश आंबेडकर तुमचे बाप आहेत का?” इम्तियाज जलील यांचं देवेंद्र फडणवीस यांना सवाल
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीसमोर नतमत्सक झाले होते. आंबेडकरांच्या त्या कृतीमुळे राज्यातील राजकारण तापले होते. यावर आंबेडकर यांनी स्पष्टीकरण देत, औरंगजेबाच्या कबरीला मी भेट दिल्याने औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल थांबली' असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीसमोर नतमत्सक झाले होते. आंबेडकरांच्या त्या कृतीमुळे राज्यातील राजकारण तापले होते. यावर आंबेडकर यांनी स्पष्टीकरण देत, औरंगजेबाच्या कबरीला मी भेट दिल्याने औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल थांबली’ असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या सभेत औरंगजेबच्या घोषणा देण्यात आल्या, ते चुकीच होते. कारण असे काही झालं नसल्याचे मला पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांचा दबाव होता, असे पोलिसांकडून मला सांगण्यात आले. मग आंबेडकर तुमचे बाप आहेत का? प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले तर तो त्यांचा अधिकार असतो, त्यांच्याबद्दल वेगळा न्याय का? त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची हिमंत फडणवीस दाखवतील का? असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला. देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बाळासाहेबांवर गुन्हा दाखल करून दाखवावे. इम्तियाज जलील कबरीवर गेल्यावर तणाव वाढतो आणि प्रकाश आंबेडकर गेल्यावर तणाव कमी झाला?” असा टोला त्यांनी गृहमंत्र्यांना लगावला.