Pankaja Munde in Solapur : राजकारणात का यावं लागलं?, पंकजा मुंडे यांनी सांगितलं कारण
लोकांचा प्रतिसाद खूप मोठा आहे. ताई येणार म्हणून महिला तयार होऊन आल्या आहेत. मला कुणाच्याही घरी जायचे नाही. नाहीतर ज्यांच्या घरी गेले नाही ते नाराज होतील. सर्वांचे आशीर्वाद घेते. ही यात्रा सफल झाली आहे. मला आशीर्वाद द्या. मला साथ द्या. माझ्यावर विश्वास ठेवा, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी करमाळा येथील सभेत केली.
सोलापूर, ९ सप्टेंबर २०२३ : करमाळ्याच्या कमलाई मंदिरात यावं, अशी लोकांची इच्छा होती. माझ्या व्यस्थतेमुळे मला येता आलं नव्हतं. २०१९ पासून आतापर्यंत २००९ ते आतापर्यंत माझं राजकीय जीवन हे वादळी ठरलं. माझा बाप एकटा पडला म्हणून मला राजकारणात यावं लागलं. मुंडे साहेबांच्या बरोबर शिकता शिकता ताईसाहेब कशी झाली मला कळलं नाही. मी मुंडे साहेबांची कन्या आहे. मी सत्तेत नसताना मी कुठलीही तडजोड केली नाही. तुमची साथ असली तर कमाल करता येईल. पाच हजार किलोमीटरची ही परिक्रमा आहे. मुंडे साहेबांवरील प्रेमामुळे तुम्ही आलाय. यात जात पात धर्म नाही. या मंचावर अनेक आडनावांची लोकं आली आहेत. कमलाईच्या साक्षीने वचन देते. माझ्याकडे येणारा कुठलाही व्यक्ती हा खाली हाताने जाऊ नये. मला कुणासमोर काही मागण्यासाठी हात पसरवावे लागू नये, ही शक्ती दे, अशी इच्छा यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे. मला साथ द्या. सोबत राहा. माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करेन, असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं.