इर्शाळवाडीचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय; मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात सांगितलं…
येथील ४० ते ५० घरांवर भीषण दरड कोसळली. ज्यात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आज तिसऱ्या दिवशीही तिथे बचावकार्य सुरू आहे. तर रस्ता नसल्याने येथील बचावकार्यात अडचणी निर्माण होत असल्याचे समोर येत आहे.
मुंबई, 22 जुलै 2023 | रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर 19 तारखेच्या रात्री काळाने घाला घातला. येथील ४० ते ५० घरांवर भीषण दरड कोसळली. ज्यात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आज तिसऱ्या दिवशीही तिथे बचावकार्य सुरू आहे. तर रस्ता नसल्याने येथील बचावकार्यात अडचणी निर्माण होत असल्याचे समोर येत आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (21 जुलै 2023) विधानसभेत निवदेन दिलं. यावेळी शिंदे यांनी . इर्शाळवाडीच्या नागरिकांसाठी महत्वाची निर्णय घेतल्याचे जाहिर केलं. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करणार असल्याची घोषणा केली. यावेळी शिंदे यांनी, “इर्शाळवाडीतील नागरिकांचं कायमस्वरुपी पुर्नवसन होत नाही तोपर्यंत त्यांचं तात्पुरत्या निवारण्याची सोय करण्यात आली आहे. कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून पुनर्वसनासाठी सिडकोला तसे आदेश देण्यात आले आहेत. तर जागेच्या संदर्भात पुर्तता होताच कायमस्वरुपी घरे बांधून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहितीही निवेदनातून मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.