अकलूजमध्ये रिंगण सोहळ्याआधीच राजकीय चर्चांना उधान; येथे लागला काँग्रेस नेत्याचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर

अकलूजमध्ये रिंगण सोहळ्याआधीच राजकीय चर्चांना उधान; येथे लागला काँग्रेस नेत्याचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर

| Updated on: Jun 24, 2023 | 11:37 AM

काही दिवसांपासून त्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागत आहेत. तर भंडाऱ्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागत होते. याची चर्चा सुरू असतानाच, आता पुन्हा एकदा त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत.

अकलूज : मागील काही दिवसांपासून विविध नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागत आहेत. त्यात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भर पडली आहे. काही दिवसांपासून त्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागत आहेत. तर भंडाऱ्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागत होते. याची चर्चा सुरू असतानाच, आता पुन्हा एकदा त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. यावेळी पटोले यांचे हे बॅनर अकलूज येथे लागले आहेत. येथे तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आहे. त्यामुळे येथे विवध पक्षांनी पालखीच्या स्वागतासाठी बॅनर लावले गेले आहेत. यातच हा फलक सगळ्यांचे लक्ष वधून घेत आहे. येथे पटोले यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. जो धवलसिंह मोहिते पाटील यांनी लावले आहेत. तर पटोले आज येथे होणाऱ्या रिंगण सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. दरम्यान भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.

Published on: Jun 24, 2023 11:37 AM