बार्शीमध्ये 3 शेतकऱ्यांनी केली अफूची लागवड

बार्शीमध्ये 3 शेतकऱ्यांनी केली अफूची लागवड

| Updated on: Mar 12, 2022 | 12:58 PM

सोलापूर(solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यातल्या फपाळवाडी या गावात तीन शेतकऱ्यांनी एकत्रितपणे अफूची लागवड केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

सोलापूर(solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यातल्या फपाळवाडी या गावात तीन शेतकऱ्यांनी एकत्रितपणे अफूची लागवड केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर बार्शी ग्रामीण पोलिसांनी संबंधित शेतावर जाऊन झडती घेतली असता शेतात अफूची लागवड केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी सर्व अफूची झाडे जप्त केली असून एकूण 14 लाख रुपयांचा हा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. यामध्ये रामेश्वर फपाळ, अरुण फपाळ आणि धर्मा फपाळ असे तीन आरोपी शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये तसेच मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कायदा कलम 15, 18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. असून फपाळवाडी शिवारात आणखी कुणी अफूची लागवड करत आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.

Published on: Mar 12, 2022 12:58 PM