गुलाल, विजयाचा जल्लोष आणि धनंजय मुंडे यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर

गुलाल, विजयाचा जल्लोष आणि धनंजय मुंडे यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर

| Updated on: Apr 29, 2023 | 9:21 PM

परळी बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जबर धक्का दिलाय. 18 पैकी 18 जागा धनंजय मुंडे गटाने जिंकून एक हाती वर्चस्व निर्माण केलंय.

बीड : राज्यात झालेल्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळाले आहे. बाजार समित्यांचा एकूण निकालात भाजप नंबर 1 ठरला असला तरी युती आणि महाविकास आघाडीच्या लढतीत महाविकास आघाडीने युतीला धूळ चारली आहे. महाविकास आघाडीने 81 बाजार समित्यांवर तर भाजप, शिंदे यांच्या शिवसेनेला 48 बाजार समित्यांवर यश मिळाले आहे. परळी बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जबर धक्का दिलाय. 18 पैकी 18 जागा धनंजय मुंडे गटाने जिंकून एक हाती वर्चस्व निर्माण केलंय. अंबाजोगाई बाजार समितीतही धनंजय मुंडे यांचीच सरशी झाली असून 18 पैकी 15 जागा धनंजय मुंडे गटाला मिळाल्या आहेत. या विजयानंतर धनंजय मुंडे आपल्या मातोश्रींच्या भेटीला गेल्या असता मुलाच्या या यशाने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

Published on: Apr 29, 2023 09:21 PM