Ganesh Naik | Deepa Chauhan प्रकरणी गणेश नाईक काय बोलले?
गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत गणेश नाईक हे समोर आले होते. आता अटकपूर्ण जामीन मिळाल्यानंतर त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. राजकारण योग्य ते स्थान न मिळाल्यानं काहींनी माध्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप गणेश नाईक यांनी केला आहे.
नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) हे पहिल्यांदाच जाहीररत्या समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते अज्ञातवासात होते. महिला अत्याचार प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या गणेश नाईकांचे जामीनासाठी प्रयत्न सुरु होते. ठाणे सत्र न्यायालयानं (Court) जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) त्यांना दिलासा दिला होता. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर गणेश नाईक यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर ते माध्यमांसमोर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर ते पहिल्यादाच जाहिरपणे समोर आले आणि त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांबाबत भाष्य केलंय. माझ्यावर लावण्यात आलेले सगळे गुन्हे एक प्रकारचं षडयंत्र आहे, असं त्यांनी म्हटलंय. आपल्यावरील सर्व आरोपही त्यांनी यावेळी बोलताना फेटाळून लावले. काहींना राजकारण योग्य ते स्थान मिळालं नसल्यानं षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप गणेश नाईक यांनी केला आहे.