पुराच्या पाण्याचा वाहतुकीला अटकावं; रस्त्यावर पाणीच पाणी; पाहा पुराच्या पाण्याची ड्रोन दृश्य

पुराच्या पाण्याचा वाहतुकीला अटकावं; रस्त्यावर पाणीच पाणी; पाहा पुराच्या पाण्याची ड्रोन दृश्य

| Updated on: Jul 24, 2023 | 11:23 AM

तेथे पंचगंगा नदीला आता पुर आला असून नदीचे पाणी शेतशिवारासह रस्त्यावर आले आहे. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यांना वाढ होत आहे. पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलय.

कोल्हापूर, 24 जुलै 2023 |  गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचपद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर पाहायाला मिळत आहे. तेथे पंचगंगा नदीला आता पुर आला असून नदीचे पाणी शेतशिवारासह रस्त्यावर आले आहे. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यांना वाढ होत आहे. पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलय. नदीकाठच्या गावातील लोकांना आता जिल्हा प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायतकडूनही वेळच स्थलांतरित होण्याचा सूचना दिल्या जातायेत. कोल्हापुरातील महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावात देखील स्थालातर होण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी गावात शिरण्याची शक्यता आहे. तर पुराचे पाणी अनेक ठिकाणी रस्त्यावर आल्यामुळे काही ठिकाणची वाहतूक ठप्प आहे. तर काही ठिकाणी याच पुराच्या पाण्यातून धोकादायक पद्धतीने प्रवास केला जात आहे. याचीच ही ड्रोन दृश्य

Published on: Jul 24, 2023 11:15 AM