Special Report |  संख्याबळात अजित पवारच पॉवरफुल्ल? काहीच दिवसात 5 आमदारांचा शरद पवार गटाला राम राम

Special Report | संख्याबळात अजित पवारच पॉवरफुल्ल? काहीच दिवसात 5 आमदारांचा शरद पवार गटाला राम राम

| Updated on: Jul 16, 2023 | 8:16 AM

काही आमदारांनी आपली तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे राषट्रवादीतील आमदारांची द्विधामनस्थिती समोर येत आहे. याचदरम्यान आता फक्त ७ दिवसात पुन्हा काही आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश करत शरद पवार यांना राम राम केला आहे.

मुंबई : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे अनेक आमदारांनी अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंत केलं आहे. तर काही आमदार हे शरद पवार यांच्याच गटात आजही आहेत. तर काही आमदारांनी आपली तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे राषट्रवादीतील आमदारांची द्विधामनस्थिती समोर येत आहे. याचदरम्यान आता फक्त ७ दिवसात पुन्हा काही आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश करत शरद पवार यांना राम राम केला आहे. ज्यामुळं आता शरद पवार यांची मुठ ढिली पडली असून त्यांचा एक एक आमदार हा अजित पवार गटाच्या गळाला लागत असल्याचे समोर येत आहे. तर आतापर्यंत अजित पवार गटाला ३६ आमदारांना पाठिंबा दिल्याचे समोर येत आहे. तर शरद पवार गटाची ताकद आता फक्त १३ आमदारांपुर्ती मर्यादित झाली आहे. गेल्या ७ दिवसांत अजित पवार गटात कोणते आमदार सामिल झाले. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 16, 2023 08:16 AM