Special Report : “ठरलं आता फोन आला की शपथविधीला जाणार;” राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कोणती खाती मिळणार?
राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठका झाल्या आहेत. या बैठकीत उर्वरित विस्तार आणि जागावाटपा संदर्भात समीकरणं ठरल्याचीसुद्धा माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्या हालचाली वाढल्या आहेत.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठका झाल्या आहेत. या बैठकीत उर्वरित विस्तार आणि जागावाटपा संदर्भात समीकरणं ठरल्याचीसुद्धा माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्या हालचाली वाढल्या आहेत. काल रात्री उशिरापर्यंत या तिघांमध्ये बैठक झाली. त्यानंतर शिवसेनेचे नेते भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आणि या भेटीनंतर आपण शपथविधीसाठी तयार असून फोन आला की लगेच निघणार असं गोगावले म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारात एकत्रच खातेवाटप होईल अशी माहिती आहे. चर अजित पवार गटाला भाजपच्या कोट्यातील मंत्रिपद मिळतील अशी माहिती आहे. शिवसेनेला 7 मंत्रिपदं मिळतील. तसंच भाजपलाही सात मंत्रिपदं मिळणार आहेत. आमचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे, असा दावा भरत गोगावले यांनी केला. दोन वरून आता तीन पक्षांचं सरकार झालं त्यामुळे प्रत्येक वेळी वाटणी करताना कसरत होणार आहे. पाहा हा स्पेशल रिपोर्ट…