मुलुंड घटनेतील ‘त्या’ पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड येथील घटनेतील आरोपी पिता, पुत्र यांना जामीन झाला आहे. पोलिसांनी काल रात्रीच तृप्ती देसाई यांच्या तक्रारीवरून या दोघांना अटक केली होती. मात्र, या निमित्ताने मनसेने जाहीर इशारा दिला आहे.
मुंबई : 28 सप्टेंबर 2023 | मुलुंडमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारणाऱ्या गुजराती पिता पुत्रांवर काल मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तृप्ती देवरुखकर यांच्या तक्रारीवरून मुलुंड पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर आज त्यांचा जामीन झाला आहे. प्रविण ठक्कर आणि त्यांचा मुलगा निलेश ठक्कर या दोघांनी तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्याने ऑफीससाठी जागा भाड्याने देण्यास नकार दिला होता. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. तो प्रचंड व्हायरल झाला. याची दाखल घेत मनसेने त्यांच्याशी संपर्क साधला. त्याच्या सहाय्याने तृप्ती देवरुखकर यांनी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात कलम ३४१, ३२३, ५०४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी रात्री अटक केली. मात्र, आज त्यांना जामीन मिळाला आहे. या प्रकरणानंतर मनसे विभाग प्रमुख राजेश चव्हाण यांनी जाहीर इशारा दिलाय.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार

शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...

युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..

'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
